आंतराष्ट्रीयक्राईम

ब्रेकिंग ; मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग ?

नवी दिल्ली, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा | अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यावर  कराचीमध्ये विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. यानंतर त्याला उपचारासाठी  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही.

दाऊद इब्राहिमला कराचीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे याची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दाऊदला कोणी विष दिलं, याबाबतही माहिती उपलब्ध झालेली नाही. सोशल मीडियावर दाऊदवर पाकिस्तानात विषप्रयोग झाल्याची बातमी व्हायरल झाली असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचंही सांगितलं जात आहे.

मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाईंड डी कंपनीचा प्रमुख असलेला दाऊद इब्राहिम भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात दाऊदचा समावेश होता. या हल्ल्यात 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर हजारो लोकं जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटानंतर भारताने दाऊदला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी म्हणून घोषित केलं. तेव्हापासून दाऊद पाकिस्तानात लपून बसला आहे. भारताने त्याच्याविरुध्द अनेकवेळा पुरावेदेखील दिले आहेत. पण दाऊद पाकिस्तानात लपला असल्याचं पाकिस्तान कबूल करत नाहीए.

दाऊद याच्या टोळीतील एका माजी सदस्याने त्याच्या आजाराबाबत माहिती दिली आहे. दाऊद गंभीर आजारामुळे रुग्णालयात असल्याचे त्याने म्हटले आहे. दाऊद याला दोन दिवसांपूर्वी कराचीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला गेला आहे. दाऊद दाखल असलेल्या मजल्यावर कोणालाही प्रवेश दिला जात नाही. पाकिस्तान सरकारमधील उच्चपदस्थ अधिकारी आणि कुटुंबातील जवळच्या सदस्यांना भेटण्याची परवानगी आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!