भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नाशिकमहाराष्ट्रराजकीय

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक : मंत्री गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य, घटक पक्षाचं टेन्शन वाढलं, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

नाशिक, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काळात होऊ घातल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून लवकरच या निवडणुकांबाबत केव्हाही घोषणा होण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्षांची असताना आप-आपल्या स्तरावर निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणूनच लढवल्या जाणार असल्याचं नेत्यांकडून सांगण्यात येत असताना गिरीश महाजन यांनी निवडणुकांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. “आम्ही युतीमध्येच लढणार, पण युती झाली तरी नाशिकमध्ये 100 पार, नाही झाली तरी 100 पार,” असं गिरीश महाजन यांनी म्हटल्याने गिरीश महाज यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे,

ते पुढे म्हणाले की, राज्यात स्थानिक स्वारज्य संस्थाच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढवणार आहोत, याला एखादी -दुसरी जागा अपवाद असू शकते, तिथे मैत्रीपूर्ण लढत होईल, मात्र आमच्यासाठी पहिला पर्याय म्हणजे महायुतीच आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं आहे.

मात्र आता दुसरीकडे भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये बोलताना महापालिका निवडणुकीबाबत अस मोठं विधान केल्याने गिरीश महाजन यांच्या या वक्तव्याने आता शिवसेना शिंदे गटाचं राष्ट्रवादी अजित पवार गातच मात्र टेन्शन वाढण्याची शक्यता झाली असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आता पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजच महायुती म्हणून लढणार,की स्वबळावर लढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!