भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

सावदा ‘ब्राम्हण हितवर्धिनी समिती’च्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सावदा येथील ‘ब्राम्हण हितवर्धिनी समिती’च्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन शहरातील श्री गचके यांच्या दत्त मंदिरात करण्यात आले होते. भगवान परशुराम हे भगवान श्रीविष्णूंचे सहावे अवतार मानले जातात. कार्यक्रमाची सुरुवात परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण करून करण्यात आली. यानंतर मंदिरात विधिवत पूजा-अर्चा आणि आरती संपन्न झाली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी भगवान परशुराम यांच्या जीवनावर आणि त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. “भगवान परशुराम हे केवळ शस्त्रधारी नव्हते, तर ते वेद-पुराणांचे जाणकार आणि न्यायाचे पुरस्कर्ते होते. समाजात शिस्त, नीतिमत्ता आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी त्यांचा आदर्श आजही मार्गदर्शक आहे,” असे प्रतिपादन समितीचे अध्यक्ष सचिन सकळकले यांच्या वतीने करण्यात आले. श्री गचके यांच्या दत्त मंदिरातील या कार्यक्रमामुळे परिसरात प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ब्राम्हण हितवर्धिनी समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. जयंती सोहळ्याच्या शेवटी उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच जळगाव येथून प्रकाशित होणारे अजय डोहळे संपादित ब्रह्मदंड या मासिकाच्या भगवान परशुराम जन्मोत्सव विशेष अंकाचे भ. परशुराम जन्मोत्सवाच्या पावन वेळी सावदा ब्राह्मण हितवर्धिनी समिती तर्फे अध्यक्ष सचिन सकळकळे व सर्व पदाधिकारी, सदस्य यांच्या हस्ते प्रकाशन केले गेले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!