भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावमहाराष्ट्र

BREAKING| जळगावसह २५ जिल्ह्यातील निर्बंध शिथिल : आरोग्यमंत्र्यांची घोषणा !

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

मुंबई, प्रतिनिधी: राज्यातील २५ जिल्ह्यांमधील निर्बर्ंध शिथिल करण्यात येत असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली असून राज्यातील ११ जिल्ह्यातील निर्बंधाबाबत मात्र शिथिलता मिळालेली नाही शिथिलता न मिळालेल्या ११ जिल्हामध्ये जळगाव नसल्याने आता जिल्ह्यातील कोरोनाचे निर्बंधा मध्ये शिथिलता मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राजेश टोपे यांनी मीडियाशी बोलताना ही घोषणा केली. राज्यातील 25 जिल्ह्यातील निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तसेच 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम राहणार असून या ठिकाणी निर्बंध कायम राहणार आहेत, आज टास्क फोर्सची बैठक पार पडल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना याबाबतची माहिती दिली. टास्क फोर्सची मिटींग पार पडली. त्यात 25 जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. तिथं सर्व निर्बंधांचे शिथिलीकरण करण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे याची फाईल जाईल. त्यावर ते सही करतील. त्यानंतर एक दोन दिवसात ही शिथिलता देण्यात येणार आहे, असं टोपे यांनी सांगितलं.

राज्यातील अकरा जिल्ह्यांमध्ये अजूनही निर्बंध कायम राहणार आहेत. यात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, बीड आणि नगर या जिल्ह्याचा समावेश असल्याची माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निर्बंध उठविण्याबाबत घोषणा केली असली तरी स्थानिक प्रशासन स्वतंत्र नोटिफिकेशनच्या माध्यमातून याची स्थानिक पातळीवर घोषणा करणार आहे. यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या घोषणेपर्यंत जिल्ह्यात निर्बंध लागू राहतील हे स्पष्ट आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!