ऐन दिवाळीत सावदा महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये खडखडाट; आता काय करायचं ग्राहकापुढे प्रश्न !
सावदा, मंडे टू मंडे वृत्तसेवा : ऐन दिवाळीत सावदा शहरातील महाराष्ट्र बँकांच्या ‘एटीएम’ मध्ये खडखडाट पाहायला मिळत असून पैसेच संपल्याने एटीएममधून पैसे निघत नसल्याने सावदा शहरासह खेडे गावावरील लोक रिकाम्या हाती परत जात असून यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. दिवाळी असल्याने बँकांनी नियोजन करणे गरजेचे होते. मात्र, बँकांच्या दुर्लक्षाचा फटका दिवाळीची खरेदी करणार्या ग्राहकांना बसत आहे.
दिवाळीला कालपासून सुरवात झाली आहे. आज मंगळवार (ता.२) धनत्रयोदशी, गुरुवारी (ता.४) रोजी ‘दिवाळी’ असल्याने शहरासह आजू बाजूच्या गावांतील लोक खरेदीसाठी एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी येत असून महाराष्ट्र बँकेच्या एटीएम मशिन मधून पैसे संपलेले असल्याने ग्राहकांची चांगलीच गैरसोय झाली असून बाजारपेठेत रोकडची चणचण जाणवत आहे. ऐन सणासुदीच्या कालावधीत शहरातील बँकांनीही नियोजन करणे गरजेचे असताना बँकांकडून मात्र असे झालेले दिसत नाही. दिवाळी सणानिमित्त शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू असल्याने बहुतांश नागरिक कॅशसाठी एटीएमवरच अवलंबून आहेत. मात्र रोकड संपल्याने एटीएममध्ये चलन तुटवडा दिसून येत असल्याने व बँक प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारावर खाते धारक संताप व्यक्त करत असून सावदा शहरासह, खिरोदा, लहान वाघोदा, मोठे वाघोदे, चिनावाल, थोरगव्हान, दसनुर, कोचुर असें परिसरातील बरीचशी खेडी गावतील मंडळी खरेदीसाठी सावदा येथे येत असतात त्यात बँकेच्या एटीएम मध्ये पैसे संपल्याने लोकांना गैरसोय होत असल्याने पैशांचा खडखडाट निर्माण झाल्याने अनेक नागरिकांना रिकाम्या हातानेच माघारी परतावे लागत आहे. इतर बँकांच्या एटीएममधून पैसे काढल्यास चार्जेस आकारले जातात व महाराष्ट्र बँक एटीएममधून पैसे निघत नाही अश्या प्रतिक्रियाही खाते धारकांकडून उमटत आहे. ग्राहकाना मनस्ताप सहन करावा लागत आहे