भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्रराजकीय

सेनेला धक्का : संजय राऊतांना जमिन घोटाळ्या प्रकरणी ईडीचं समन्स !

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सरकारला हादरे बसत असतानाच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने समन्स पाठवला आहे. त्यानुसार संजय राऊत यांना २८ तारखेला मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे संजय राऊतांना ईडीचा मोठा झटका बसल्याचं बोललं जातंय.

ई़डीने संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात चौकशी करण्यासाठी समन्स पाठवले आहे. गोरेगावमधील पत्राचाळ जमीन प्रकरणात १०३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. यापैकी काही पैसे संजय राऊत यांना मिळाल्याचा आरोप आहे. याच पैशातून संजय राऊत यांनी अलिबागमध्ये भूखंड खरेदी केल्याचा दावा करण्यात आला होता. या भूखंडांची किंमत साधारण ६० लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. तसेच स्थानिक लोकांना धमकावून हे भूखंड कमी पैशात खरेदी करण्यात आले, असाही आरोप आहे.

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्यीय मित्र प्रवीण राऊत यांनाही ईडीने अटक केली होती. त्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीच्याआधारे ईडीने संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली. संजय राऊत यांनी आपल्याला ईडीची कोणतीही नोटीस मिळाली असल्याचे स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!