Breaking News | परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस – खासदार राऊतांनी दिली माहिती
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई, मंडे टू मंडे वृत्तसेवा। महाविकास आघाडीतील परिवहन मंत्री आणि शिवसेने नेते अनिल परब यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. अनिल परब यांना मंगळवारी चौकशी साठी ईडी कार्यलयात हजर राहण्यास सांगितले आहे. अनिल परब यांना ईडीची नोटीस (ED Notice) बजावली आल्याची माहिती शिवेसना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यांना ईडीने येत्या मंगळावरी म्हणजे 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असताना आता ईडीने मोठी कारवाई केली आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केली आहे. याबद्दलची माहिती खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिलीय. ट्विट करताना आम्ही कायद्यानेच लढू असे सांगत राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करत जन आशीर्वाद यात्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली असे म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात सुरु असलेल्या वादात आता नवा मुद्दा सामील झाला आहे. यामुळे भाजप शिवसेनेतील वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांनी रविवारी महाविकास आघाडी सरकारमधील बरेच मंत्री ईडी आणि सीबीआयच्या रडावर असल्याचे म्हटलं होते.
शाब्बास!
जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली . वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत.
chronology कृपया समज लिजीये.
कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र— Sanjay Raut (@rautsanjay61) August 29, 2021
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली . वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र” अशा शब्दात संजय राऊत यांनी अनिल परब यांच्या नोटीसवरुन भाजपवर निशाण साधला आहे. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा नारायण राणेंना केंद्रस्थानी ठेवून भाजपवर आरोप केला आहे.
नारायण राणेंना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली होती. शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. नारायण राणेंना अटक करण्यामध्ये अनिल परब यांचा हात होता असा आरोप भाजपने केला होता. यामुळे अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी भाजप नेते आशीष शेलार यांनी केली होती. तर आता अनिल परब यांना ईडीची नोटीस आली असल्याची माहिती मिळाली आहे. हा सर्व प्रकार सुडबुद्दीने होत असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांकडून करण्यात येत आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत नारायण राणेंवर निशाणा साधला आहे.
शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना कोणत्या प्रकरणात ईडीने नोटीस जारी केली आहे. याबाबत अद्याप माहिती प्राप्त झाली नाही. सध्या अनिल परब यांच्याविरोधात ५ ते ६ आरोपांविरोधात वेगवेगळ्या चौकशा सुरु आहेत. सीबीआय, ईडी, नाशिक पोलीस अशा अनेक तपास यंत्रणांचा ससेमीरा सध्या अनिल परब यांच्यामागे आहे. यामुळे ईडीने कोणत्या प्रकरणात नोटीस जारी केली आहे याबाबत अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आली नाही. अनिल परब मंगळवारी चौकशीसाठी हजर राहणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा