भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव कोरोनाच्या टॉप १० हॉटस्पॉट मध्ये; जिल्ह्यात संसर्गाचा झपाट्याने फैलाव !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी)।  देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील ८ जिल्हे हे देशातील १० हॉटस्पॉट असलेल्या शहरांपैकी एक आहेत. या ८ जिल्ह्यात जळगावचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या संसर्गाचा ( jalgaon covid cases ) झपाट्याने वाढत आहे. शनिवारी देखील सलग चौथ्या दिवशी नऊशेपार नविन बाधित रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. शनिवारी रात्री जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ९८६ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील सर्वच १५ तालुक्यांमध्ये करोनाने हात पसरायला सुरुवात केली आहे. जळगाव शहर हे सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोरोनाचा प्रमुख हॉटस्पॉट आहे. जळगावात शहरात एकाच दिवशी तब्बल ३५० पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. तसेच जळगाव ग्रामीण-२६, भुसावळ- ८९, अमळनेर- ०२, चोपडा-१४१, पाचोरा-४६, भडगाव-०२, धरणगाव-३४, यावल-३२, एरंडोल-८९, जामनेर-६७, रावेर-२४, पारोळा-३३, चाळीसगाव-०९, मुक्ताईनगर-१८, बोदवड-३१, इतर जिल्ह्यातील-०३ असे एकुण ९८६ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ६९ हजार ६४८ पर्यंत पोहचली असून ६० हजार ९३५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर ४१८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १४३८ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ७२७५ रुग्ण सध्या उपचार घेताय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!