भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

सरकार लॉकडाऊन अधिक कडक करण्याच्या तयारीत, सामान्यांना पेट्रोल बंद करण्याचे संकेत !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई (प्रतिनिधी)। राज्यातील कोरोना परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या रोखण्यासाठी तसेच कोरोना प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने काही कठोर निर्बंध लागू केले असून राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊनमध्ये काही कामांना परवानगी दिली असल्यामुळे नागिरकांचे बाहेर पडण्याचे प्रमाण अधिक असल्याने लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघ झाले आहे.

अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलंय.मात्र, राज्यातील विविध भागात रस्त्यांवर, किराणा दुकान, भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात कोरोना निर्बंधांची कडक अंमलबजावणी होत नसल्यामुळे अधिक कडक निर्बंध लागू करण्यत येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. नागरिकांची गर्दी कमी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही. त्यामुळे आता फक्त अत्यावश्य सेवेतील लोकांनाच इंधन दिले जाणार आहे. त्याबाबत सरकार विचाराधीन असल्याचे ते म्हणाले, तसेच अत्यावश्य कामाशिवाय लोकलचा वापर केल्यास संबंधितांवर कडक कारावाई करण्यात येणार आहे. तसेच भाजीपाला,किराणा दुकानांना दिलेली सूट रद्द करणार असल्याचा इशाराही मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

लॉकडाऊन आता अधिक कडक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय. लोकल सेवेचा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी वगळून इतरांनी वापर केल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाणार आहे. लोकल सेवा वापराबाबत कडक निर्बंध करावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणी झाल्याचंही वडेट्टीवारांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!