झालं ठरलं, राज्यात आज लॉकडाऊनची अधिकृत घोषणा होणार- सूत्रांची माहिती
मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।
मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार हे निश्चित झाले असून आज रात्रीपर्यंत शासनाकडून अधिकृत अधिसूचना जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकार कडून राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्याच्या हालचालींना गेल्या अनेक दिवसांपासून वेग आला आहे. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्याच्या संदर्भात राज्य सरकारने निश्चित केले आहे. या संदर्भात आज अधिकृत अधिसूचना जाहीर होणार असल्याची माहिती मिळाली असून राज्यात लागू करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनची अधिकृत अधिसूचना जाहीर होणार असल्याची माहीती सूत्रांनी दिलीय. मात्र प्रत्यक्षात लाँकडाऊनची अंमलबजावणी 15 एप्रिल पासून सुरू होणार आहे. उद्या मध्य रात्री 12 वाजल्या नंतर राज्यात कडक लाँकडाऊनची अंलबजावणी सुरू होईल. यावेळी राज्यात लागू करण्यात येणाऱ्या 2.0 कडक लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्या नागरिकांना काय आणि कुठे दिलासा मिळनार हे आज जाहीर होणाऱ्या अधिसूचनेत समजेल.
महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वी राज्यात कडक निर्बंधांसह मिनी लॉकडाऊन जाहीर केला. मात्र, कडक निर्बंध लागू करण्यात आले असतानाही राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यामुळेच आता राज्य सरकारने राज्यात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याचे समजत आहे.