भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

ठाकरे सरकारला दुसरा धक्का : अजित पवारांना 1000 कोटींच्या संपत्ती जप्तीची आयकर विभागाची नोटीस

मुंबई, प्रतिनिधी : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने रात्री उशीरा अटक केली आहे. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित संपत्ती जप्त करण्याची नोटीस आयकर विभागाने काढली आहे. त्यामुळे दिवसभरात हा महाविकास आघाडी सरकारला बसलेला दुसरा झटका आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने ज्या संपत्ती जप्त करण्याच्या संदर्भात नोटीस बजावली आहे त्यामध्ये एक साखर कारखाना, दक्षिण दिल्लीतील एक फ्लॅट, गोव्यातील मालमत्ता, मुंबईतील निर्मल इमारतीचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांचे नातेवाईक आणि निकटवर्तीयांच्या घरावर आयकर विभागाकडून झाडाझडती करण्यात येत आहे. त्यानंतर आता आयकर विभागाने अजित पवारांच्या संबंधित मालमत्ता जप्तीची नोटीस काढली आहे.

या कारवाईअंतर्गंत अजित पवारांशी संबंधित कोट्यवधींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाची कारवाई झाली असून ९० दिवसांच्या कालावधीत प्रॉपर्टी बेनामी नसल्याची सत्यता सिद्ध करावी लागणार आहे. आयकर विभागानं अजित पवार यांच्याशी निगडीत ५ संपत्तीवर जप्ती आणण्याचे आदेश असून ही संपत्ती जवळपास १ हजार कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!