भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

“हमको तो तलाश बस नये रास्तों की है”; संजय राऊतांचे नवे ट्वीट चर्चेत !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस दलातील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांनंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले असल्याची चर्चा आहे. याबाबत शिवसेनेचे संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. मात्र, आता त्यांनी केलेलं एक ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहे. नव्या ट्वीटमुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, याबाबत चर्चा रंगली आहे.

संजय राऊत यांनी शनिवारी रात्री पत्रकारांशी बोलताना, मला याबाबत माहिती नाही, या आरोपांची मला कल्पना नाही. त्यामुळे, मला सध्या काहीही बोलायचं नाही, असे म्हटले होते. त्यानंतर, संजय राऊत यांनी रविवारी सकाळीच एक ट्वीट केलं आहे. त्यांनी नेहमीप्रमाणेच शायरीतून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळं त्यांच्या ट्वीटचा नेमका अर्थ काय याविषयी चर्चा रंगली आहे. अशारितीने सर्वांनाच संभ्रमात टाकलंय. 

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!