भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

होळीच्या दिवशी राज्यात कोरोनाचा उद्रेक; 24 तासात 40,414 नवे रुग्ण

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई: वृत्तसंस्था। राज्यात कोरोनाना हाहाकार पाहायला मिळत आहे. आज तर राज्यात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या पाहायला मिळाली आहे. आज राज्यात 40,414 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ही रुग्णसंख्या आतापर्यंतची सर्वाधिक असल्याचं सांगितलं जात आहे. त्याशिवाय राज्यात 108 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज राज्यातील 17,847 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत 23,32,453 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्याशिवाय राज्याचा रिकव्हरी रेट 85.95 पर्यंत पोहोचला आहे.

राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या अत्यंत वेगाने वाढत असल्याचे दिसत आहे. लॉकडाऊन संदर्भात आज आयोजित महत्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्गास आळा घालण्याची आदेश दिले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!