भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीसाठी अमित शहांना पत्र

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई (वृत्तसेवा): राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ढासळली असल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजप नेत्याने गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. विधीमंडळ अधिवेशनादरम्यानही भाजप नेत्यांनी सातत्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत वक्तव्य केले होते.   राज्य हाताळण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी पडत आहे, यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. राज्यात जनतेसह कोणतीही महिला सुरक्षित नाही, अशी भयावह परिस्थिती सध्या राज्यात आहे. सचिन वाझे यांच्यावरुन नारायण राणे यांनी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. शिवसेनेचा सचिन वाझेंना आसरा आहे, असा गंभीर आरोप राणे यांनी केला आहे. सचिन वाझे यांनी अनेक मोठी प्रकरणं हाताळली. त्या सर्व प्रकरणांची चौकशी व्हावी, अशी मागणी राणे यांनी केली.

मुकेश अंबांनी यांच्या बाहेर स्फोटकं आढळली, मनसुख हिरेनची संशयास्पद हत्या या सर्व घटना संशयास्पद आहे. सचिन वाझेंच्या अटकेनंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया देताना नारायण राणे म्हणाले की, सचिन वाझेंनी अनेक मोठ मोठी प्रकरणं हाताळली आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये त्यांची चौकशी करावी., सचिन वाझें यांनी प्रोटेक्ट करणारे सत्तेत आहेत का? त्यांची पोस्टींग कोणी केली? अशी सर्व माहिती सर्वांसमोर येणं आवश्यक आहे. यासह दिशा सालियन, सुशात सिंह या सर्व प्रकरणांची चौकशी झालीच पाहिजे. जे कोण बोलतंय सरकार विरोधात, या आरोपीबद्दल त्यांच्या जीवाला धोका असल्याचेही सांगितले जात आहे, असे म्हणत भाजप खासदार नारायण राणेंनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले.

एकाबाजूला भ्रष्टाचार तर दूसरीकडे कोणताही कायदा राहिलेला नाही. जनतेच्या कोणत्याही प्रश्नाला प्राधान्य दिले जात नसून यासंदर्भात कोणतेही नियोजन सरकारकडून केले जात नाही. तर फक्त सचिन वाझे यांच्या बदलीला महत्त्व दिले जात असून मुख्यमंत्री त्यांचे समर्थन करताना दिसताय त्यामुळे अनेक सचिन वाझे तयार होतार होतील, अशी चिंता देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. तर या सर्व प्रकरणात मुंबई पोलिसांचा वापर केवळ स्वार्थासाठी केला जातोय, असेही ते म्हणाले.

‘या राज्यात अशाच आत्महत्या होणार असतील, मुडदे पडणार असतील तर अशा घटना रोखल्या जाव्यात असं मला वाटतं, पण हे सगळं कोणाला सागावं यासाठी मी केंद्रसरकारला, अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे. त्याद्वारे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था याची माहिती त्यांना दिली.’ यासह जनता सुरक्षित नाही, निरपराध लोकांची हत्या, महिलांची हत्या होऊन आत्महत्या दाखवल्या जाताय. त्यामुळे यासर्व परिस्थितीची चौकशी व्हावी. हे राज्य हाताळण्यासाठी हे सरकार कमी पडल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी अमित शहा यांना पत्राद्वारे केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!