मला जगायचच नाही ! तडकाफडकी बदलीमुळे पोलिसाकडून इच्छा मरणाची विनवणी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई: वृत्तसंस्था। राज्यापासून ते दिल्ली पर्यंत महाविकास आघाडीतील पोलिस बदल्यांचे फोन टॅपिंग प्रकरणत गाजत असतानाच पोलिस दलातील आणखी एक बदली प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात पोलिस अधिक्षकाने राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी केली आहे. या संपुर्ण तडकाफडकी बदलीच्या प्रकरणामध्ये माझ्यावर अन्याय झाला आहे. माझ्या सेवानिवृत्तीला अवघे अडीच महिने असताना केवळ काही अधिकाऱ्यांच्या षडयंत्रामुळे माझ्यावर हा अन्याय होत आहेत. म्हणूनच मला इच्छामरणासाठी परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या संपुर्ण प्रकरणात अर्थकारणही जोडले गेले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पोलिस दलातील बदल्यांच्या प्रकरणात आणखी एका बंडामुळे ठाकरे सरकारच्या अडचणीत भर पडणार आहे.
आपली तडकाफडकी बदली केल्याने राज्यातील पोलिस दलातील आणखी एक नाराजी समोर आली आहे. पुण्यातील कारागृह अधिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या हिरालाल जाधव अधिकाऱ्याची बदली झाल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. त्यामुळेच मला राष्ट्रपतींनी इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी विनवणी त्यांनी केली आहे. आपली तडकाफडकी बदली केल्यानेच त्यांनी ही इच्छा मरणाची विनंती राष्ट्रपतींना केली आहे. कारागृहातील कैद्यांवर बेशिस्ती विरोधात कारवाई केल्यानेच ही कारवाई केल्याचे आपली बदली केली गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. गॅंगरेप, पॉस्को, फरार कैद्यांविरोधात गैरवर्तनाबद्दल मी या कैद्यांविरोधात कारवाई केली. त्यामुळेच माझ्याविरोधात काही पोलिस अधिकाऱ्यांनी षडयंत्र रचत ही कारवाई केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलिस अधिकाऱ्याच्या या बंडामुळे आणखी एका पोलिसाची नाराजी समोर आली आहे.
जेलमध्ये कैद्यांविरोधात कारवाई केल्यानेच माझ्याविरोधात जेलर आणि तायडे या पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी तक्रारी करायला लावल्या. जेएमएफसीमार्फत आणि हायकोर्टामार्फत या तक्रारी एडीजी ऑफिसपर्यंत आल्या. शासनाने या प्रकरणात कोणतही म्हणण न एकताच मला या संपुर्ण प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. माझ्या सेवानिवृत्तीला अवघ्या अडीच महिन्याांचा कालावधी उरलेला असतानाच कारवाई झाल्याने या पोलिस अधिकाऱ्याने उघड नाराजी व्यक्त केली आहे. शासनाकडून या संपुर्ण प्रकरणात आपली बाजू एकून घेण्यात आली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सन्मानाने जगण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण माझ्यावर अन्याय झाल्यानेच मी राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्याकडे केला असल्याचे हिरालाल जाधव यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. या संपुर्ण प्रकरणात काही प्रमाणात अर्थकारणही झाले असल्याचा आरोपही त्यांनी व्यक्त केला आहे.