भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीयराष्ट्रीय

समर्थकांच्या राजीनामा सत्रादरम्यान, पंकजा मुंडे पंतप्रधानांच्या भेटीला : मोठा निर्णय होणार ?

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे अचानक दिल्लीत आल्या. त्यांनतर त्या आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेल्या आहेत. त्यांच्यासोबत जेपी नड्डाही आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्याकडे संघटनात्मक पातळीवर मोठी जबाबदारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीत वर्तवली जात असून त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. त्यात प्रीतम मुंडे यांचा समावेश होणार असल्याचा कयास होता. मात्र, प्रीतम मुंडें ऐवजी डॉ. भागवत कराड यांना मंत्रीपद देण्यात आलं. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासाही केला. मात्र, कालपासून पंकजा समर्थकांनी अचानक राजीनामे दिल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. त्यातच पंकजा मुंडे अचानक दिल्लीत दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. पंकजा मुंडे पंतप्रधान मोदी यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचप्रमाणे नाराज गटातील विनोद तावडे व विजया रहाटकर याही त्यांच्यासोबत असल्याचे समजते. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होणार, याबाबत तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहे. भाजपकडून पंकजा यांची समजूत काढली जाते की त्यांना काही आश्वासन मिळणार, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. 

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!