अजितदादा शब्दाचे पक्के, पुन्हा आमच्यासोबत यावे, भाजपच्या नेत्याची ऑफर
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे शपथविधी घेतला होता. याबाबत आताही चर्चा सुरु असते. यावरुनच आता अजित पवार शब्दांचे पक्के, त्यांनी पुन्हा एकदा आमच्यासोबत यावे अशी खुली ऑफर भाजपच्या ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
- राज्यासह देशभरात राम मंदिरं सजली ; मोठ्या उत्साहात साजरा केला जातोयं श्री राम जन्मोत्सव
- पिकप वाहनाचे टायर फुटल्याने तरुणाचा जागीच मृत्यू, ६ जखमी
- पत्नीवर अनैसर्गिक कृत्य, सासऱ्यांसह नणंदोयांचाही बलात्कार
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उत्तम प्रशासक आणि स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. फडणवीसांनी महाराष्ट्रात लवकर भाजपचे सरकार आणावे. उपमुख्यमंत्री अजित पवार स्पष्टवक्ते आणि शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी पुन्हा आमच्यासोबत यावे अशी थेट ऑफर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रमा प्रसंगी यांनी म्हटले आहे.
दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री ठाकरे फार संयमी आणि मितभाषी आहेत. त्यांनी आपल्या चुकीच्या सल्लागारांची साथ सोडली पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला आहे. आगामी काळात मंत्री नाही तर विरोधी पक्षनेता व्यायला आवडेल. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय योग्य आणि आयुष्याला कलाटणी देणार होता. आम्ही वडिलांच्या विचाराने पुढे जात आहोत. आमच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत.