भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

शिंदे गटांतील आमदारांना आता केंद्राची वाय प्लस दर्जाची सुरक्षा !

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : बंडखोर आमदारांविरोधात शिवसेना प्रचंड आक्रमक झाली असून राज्यात काही ठिकाणी तोडफोडीचे प्रकार घडल्याने शिंदे गटांतील आमदारांना त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून त्या पार्श्वभूमीवर केंद्रातील भाजप सरकार बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल उचलेले आहे. बंडखोर आमदारांचना आता केंद्र सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. आमदारांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ चे जवान तैनात करण्यात येणार आहे.

बंडखोर आमदारांच्या विरोधात मुंबई, पुण्यासह राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजीसह पोस्टर्सला काळं फासण्याच्या घटना समोर आल्या आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर शिवसेना आमदारांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर बरीच खलबतं झाल्यानंतर आता या आमदारांना थेट केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. शिंदे गटातील पंधरा आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या पूर्ण घराला बॅरिकेट्स लावण्यात आलं आहे. 

शिवसेनेनच्या बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेतेसाठी केंद्र सरकार पुढं सरसावले आहे. या बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राज्यातील ज्या आमदार, मंत्र्यांचे कुटुंबीय मागणी करतील, त्यांना सुरक्षा देण्यात येणार आहे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाकडू स्पष्ट करण्यात आले आहे. शिवसेनेकडून राज्यात ठिकठिकाणी होणाऱ्या आंदोलनामुळे केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. काल शिंदे गटातील 15 आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृह सचिव  आणि राज्यपाल यांना पत्र लिहिलं होतं त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!