भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

38 आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढला, सरकार अल्पमतात; शिंदे गटाचा दावा

नवी दिल्ली, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ घडवणारी एक मोठी बातमी आहे. एकनाथ शिंदे  यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केली आहे. त्यातील एका याचिकेत एक मोठा दावा करण्यात आला आहे. शिवसेनेच्या 38 आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे हे सरकार अल्पमतात आलं आहे. त्यामुळे विधानसभेचे उपाध्यक्ष कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. कुणालाही निलंबित करण्याचा अधिकार नाही, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे

आता शिवसेनेचे वकील काय बाजू मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचं पत्रं विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री किंवा राज्यपालांकडे देण्यात आलं पाहिजे की ते कोर्टाला दिलं पाहिजे? सरकारला पाठिंबा दिला हे कधी म्हणता येईल? कुणाला पत्रं दिल्यावर म्हणता येईल? यावरही कोर्टात खल होणार असून कोर्ट आता त्यावर काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आमच्याकडे एकूण 51 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यात शिवसेनेचे 39 आमदार आहेत. कालपर्यंत हा आकडा 38 होता. उदय सामंत आल्याने तो 39 झाला आहे. दोन तृतियांशच्या आकड्यासाठी 36 आमदार लागतात. त्यामुळे आमच्याकडे पुरेसा आकडा आहे, असा दावा त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!