महाविकास आघाडीला सुरुंग ; आघाडीची मते फुटली : भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha election) महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. अत्यंत चुरशीने झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला. महाविकास आघाडीकडील दहा मते फुटली व सहाव्या जागेवर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले. शनिवारी पहाटे चार वाजता हा निकाल जाहीर करण्यात आला.
पहिल्या पसंतीची संजय पवार यांना ३३ आणि धनंजय महाडिक यांना २७ मते मिळाली आहेत. त्यामुळे दुसऱ्या फेरीमध्ये हा निर्णय गेला आहे. पहिल्या फेरीमध्ये भाजपचे पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना ४८-४८ मते मिळाली आहेत. त्यामुळे त्यांच्या मताचा फायचा हा धनंजय महाडिक यांना झाला. दुसऱ्या फेरीची मतमोजणीत ते विजयी झाले. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस होती. भाजपने आपली खेळी यशस्वी करत आपला सहावा उमेदवार निवडून आणला.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात होते. त्यात सहाव्या जागेवरून महाविकास आघाडी विशेषत: शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष झाला. अपक्ष आणि छोट्या पक्षांना गळाला लावण्याच्या शर्यतीपासून एकमेकांचे आमदार फोडण्याच्या चाली खेळल्या गेल्या. त्यामुळे या जागेकडे साऱ्यांचे होते. त्यात भाजपने बाजी मारली. अपक्ष आणि बहुजन विकास आघाडी, एमआयएम, समाजवादी पक्ष आणि इतर पक्षाच्या मतांवर दोन्ही गटांचा डोळा होता. त्यात भाजपची सरशी झाल्याचे मतदानाच्या आकड्यांवरून दिसत आहे.
राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला. शिवसेनेचे संजय राऊत, काँग्रेसचे इमरान प्रताप गढी, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे हे पहिल्या फेरीतच विजयी झाले आहे. त्यासाठी एक- एक मत महत्त्वाचे होते. अशात आता शिवसेनेला धक्का बसला होता. आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात आले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिली आहे. त्याचवेळी यशोमती ठाकुर, जितेंद्र आव्हाड व भाजपचे मुनगंटीवार आणि रवी राणा यांचे मत वैध ठरवण्यात आले.