बोरू बहाद्दर कारकून, “ढ” टीम चे कप्तान तोंडावर आपटले– मनसेने शिवसेनेला डिवचल
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठीचे निकाल झाले. यात सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या गेल्या सहाव्या जागेवर शिवसेनेच्या संजय पवार यांचा भाजपच्या धनंजय महाडिक यांनी पराभव करत विजय प्राप्त केला. तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार यात विजयी झाले, तर एकट्या भाजपचे 3 उमेदवार विजयी झाले, त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खेळी महाविकास आघाडी सरकारवर भारी पडल्याचे म्हटले जातेय, यावरून आता मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला डिवचलं आहे.
- सावदा सह दूध उत्पादक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
- बनावट शालार्थ आयडी प्रकरणाला नवे वळण ; लॅब असिस्टंट ने केली २३ शिक्षकांची भरती,बनावट कागदपत्रांच्या आधारे वेतन, अजून कोण कोण सामील?
- सात गंभीर गुन्ह्यांतील ‘शोएब बिल्डर’ एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध ; येरवड्यात रवानगी
शिवसेना ही महाविकास आघाडीतील “ढ”टीम आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल’, बोरू बहाद्दर कारकून आणि “ढ” टीम चे कप्तान तोंडावर आपटले. अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. भाजपने महाविकास आघाडी समर्थक 6 अपक्ष आमदारांना फोडले आणि पहिल्या पसंतीची मतं मिळवली. तसेच मनसेने 1 मत आणि बहुजन विकास आघाडीनेही त्यांची 3 मतं भाजपला दिली. त्यामुळे एकूण 10 अतिरिक्तं मतं भाजपला मिळाली. यामुळे संख्याबळामुळे भाजपचे तीनही उमेदवार जिंकून आले.





