बिग ब्रेकिंग : राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी एकनाथ खडसेना उमेदवारी, आज अर्ज भरणार !
मुंबई, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकनाथ खडसे (Eknath khadse) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत रामराजे निंबाळकर यांना सुद्धा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
- मधुमेह, हृदयरोग, गंभीर स्वरूपाचा संसर्ग सह ९०० औषधांच्या किंमतीत वाढ
- वाळूचे अवैध उत्खनन रोखण्यात अपयश, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार निलंबित, दोघे भ्रष्टाचारात लिप्त असल्याचा चौकशीत ठपका
- मुक्ताईनगर/बोदवड तालुका व शहर काँग्रेस कमिटी आढावा बैठक संपन्न….
राज्यसभा निवडणुकीसोबतच विधान परिषद निवडणुकीची देखील रणधुमाळी सुरू आहे. उद्या दि.१० रोजी राज्यसभेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून दि.२० रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. विधान परिषदेसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची नावे निश्चित केल्यानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही आपले पत्ते उघड करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीकडून विधानपरिषद उमेदवारीसाठी एकनाथराव खडसे आण रामराजे निंबाळकर याना उमेदवारी देण्यात आली आहे. आज सकाळी ११ वाजता दोन्ही नेते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
आगामी महापालिका निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंना विधान परिषद उमेदवारी दिल्याने या प्रदेशातील प्रभाव वाढवणं राष्ट्रवादी काँग्रेसला सोपं जाईल. या भागात भाजप नेते गिरीश महाजन यांना रोखण्यासाठी खडसे यांना मैदानात राष्ट्रवादीने उतरवले आहे.