भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

शिवरायांच्या भूमीत औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय?; जमीनदोस्त करा;– मनसेची मागणी

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला जाऊन माथा टेकवल्याने नविन वादाला तोंड फुटले आहे. राज्यातील विविध नेते यावरुन टीका करत आहे. शिवरायांच्या भूमीत औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय ? औरंगजेबचं हे थडगं उद्धवस्त करण्याची मागणी मनसेचे गजानन काळे यांनी केल्याने मनसे आता या विषयांवर आक्रमक होतांना दिसत आहे.

मनसेचे गजानन काळे यासंदर्भात म्हणाले, शिवरायांच्या भूमीत औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय ? जमीनदोस्त करा हे थडग, म्हणजे या अवलादी तिथे माथा टेकायला येणार नाहीत. माननीय बाळासाहेब ठाकरेही हेच म्हणाले होते, त्यांचं काहीच ऐकायचे नाही असं ठरवलं आहे का? तसंही औरंगाबादच्या नामांतरावरून तुम्ही सरळ सरळ पलटी मारली आहेच, असं म्हणते मनेसेने मुख्यमंत्र्यांना डिवचलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेनेतील वाद चिघळण्याची शक्यता आहे.

तसेच पुढे बोलताना हे थडगं काय अकबरोद्दीन औवेसींसारख्यांना नतमस्तक होण्यासाठी ठेवलं आहे का असा सवाल मनसेनं थेट औवेसींचा उल्लेख टाळत केलाय. “या शिवरायांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय आहे? ही निजामाची औलाद इथं येऊन या थडग्यावर नतमस्तक होणार. यासाठी हे थडगं ठेवलं आहे का?,” असा प्रश्न काळे यांनी उपस्थित केलाय.

दरम्यान, सध्या राज्यात औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करा, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. यावरून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. टोपे म्हणाले, औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचं महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नाही. हे त्या त्या पक्षाचे अजेंडे असतात. माझं व्यक्तिगत मत देणं योग्य नाही. हा विषय सरकारच्या अजेंड्यावर नाही आणि आमच्या पक्षाच्या तर अजिबातच नाही. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (Shivsena) लोक संभाजीनगर म्हणतात. त्यात त्यांना आनंद वाटतो.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!