भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावमहाराष्ट्रराजकीय

राष्ट्रवादीचं ठरलं; विधान परिषदेसाठी एकनाथ खडसेंना मिळणार संधी?

मुंबई, मंडे टू मंडे न्युज स्पेशल रिपोर्ट : राज्यसभा निवडणुकीमुळं राजकीय घडामोडींना वेग आला असताना आता विधान परिषदेच्या उमेवारांची नावे समोर येऊ लागली आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही दोन नावे अंतिम झाल्याचे समजत असून माजी मंत्री एकनाथ खडसे व रामराजे निंबाळकर यांना विधानपरिषदेत संधी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

राज्यसभा निवडणुकीनंतर राज्यात विधान परिषदेची निवडणूक (Vidhan Parishad Elelction) आहे. एकूण १० आमदार निवडून देण्यासाठी येत्या २० जून रोजी मतदान होणार आहे. त्यानुसार राष्ट्रवादीचे दोन सदस्य हमखास निवडून जातील, अशी स्थिती आहे. त्यासाठी खडसेंच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज सकाळी रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांनी यांनी भेट घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रबळ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला खानदेशातून एकनाथ खडसेंसारखा मजबूत नेता मिळाला. त्यामुळे या प्रदेशातही पक्ष विस्तार करण्यास राष्ट्रवादीला संधी आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंना विधान परिषद उमेदवारी दिल्याने या प्रदेशातील प्रभाव वाढवणं राष्ट्रवादी काँग्रेसला सोपं जाईल. या भागातील भाजपच्या गिरीश महाजनांसमोर खडसे समर्थकांचं आव्हान उभं करता येईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसेंना ही संधी देण्याची गांभीर्याने चर्चा सुरू आहे.

भाजप मधून राष्ट्रवादी प्रवेश करतांना खडसेंच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातच नव्हे तर खानदेशात राष्ट्रवादीची भरभराट होईल, अशी खात्री शरद पवारांनी व्यक्त केली होती. तशी अपेक्षा बाळगणे स्वाभाविक आहे. पण, दीड वर्षातील एकूणच स्थिती बघता, लांबणीवर पडलेल्या निवडणुका मुळे तसे काही झालेले नाही. अर्थात, खडसेंची क्षमता सिद्ध करण्यासाठी जिल्हा बँक निवडणुकी शिवाय अन्य कोणतीही निवडणूक अद्याप झालेली नाही. दुसरीकडे, राष्ट्रवादीत पुनर्वसन होईल ही खडसेंची अपेक्षाही अपूर्ण आहे.. त्यामुळे कुठले पदच नाही तर प्रभाव कसा दाखविणार? असा दावा खडसे समर्थक करू शकता. परिणामी, खडसेंच्या प्रवेशाने ना राष्ट्रवादीला लाभ झाला, ना राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधून खडसेंच्या पदरी काही पडले.. यामुळे विधानपरिषदेसाठीच्या चर्चेने कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून ऊसाह पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादीकडून निंबाळकर आणि खडसेंना उमेदवारी मिळणार आहे. रामराजे निंबाळकर विधान परिषदेचे सभापती आहेत. त्यामुळं पुन्हा त्यांना संधी मिळेल, अशी चिन्हे आहेत. याचवेळी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनाही उमेदवारी मिळेल. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांनी राज्यपालनियुक्त सदस्यांसाठी 12 नावे पाठवली होती. त्यातही खडसेंचा समावेश होता. पण राज्यपालांनी अद्याप यावर निर्णय न घेतल्यानं खडसेंची आमदारकीही रखडली होती, याची भरपाई म्हणून खडसेना विधानपरिषदेवर पाठवून आमदार करण्याची तयारी राष्ट्रवादी केल्याचे बोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!