…ते कोणाचेच नसतात, म्हणत खा. संजय राऊतांचा राज्यसभा निकालावरून जोरदार हल्लाबोल
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : काही जे बाजारातले नेहमीचे घोडे असतात, ते घोडे विकले गेले. ते घोडे बाजारात होते. जास्त बोली लागली, असं मला वाटतंय. इतर काही कारणं असतील. त्यामुळेच आमची साधारण सहा एक मतं होती, अपक्षांची ती आम्हाला मिळाली नाहीत. ते कोणाचेच नसतात, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी अपक्ष आमदारांवर जोरदार हल्ला चढवला आहे.
- महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांना रावेर तालुक्यात जोरदार प्रतिसाद,जावळेंना निवडून आणण्याचा मतदारांचा निर्धार
- रावेर तालुक्यात २२ लाखांचा गुटखा जप्त, गुटखा तस्करांमध्ये खळबळ
- जळगावचे तत्कालीन पोलिस अधीक्षक यांना न्यायालयाचे समन्स
आमचे जे घटकपक्ष आहेत, छोटे पक्ष आहेत जे शिवसेनेबरोबर किंवा महाविकास आघाडीबरोबर आहेत, त्यांचं एकही मत फुटलं नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असेल, बच्चू कडूंचा पक्ष असेल, शंकरराव गडाख असतील, येड्राव्हकर असतील किंवा इतर काही मते असतील जी आम्ही चर्चा केली होती. जे पक्षाबरोबर आणि आघाडीबरोबर आहेत ती मतं सगळीच्या सगळी आम्हाला मिळालेली आहेत. फक्त घोडेबाजारात जे लोक उभे होते, त्यांची सहा ते सात मतं मिळू शकलेली नाहीत. आम्ही कोणत्याही व्यवहारात पडलेलो नाही. आम्ही व्यापार केला नाही. तरी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 33 मतं मिळाली. हासुद्धा आमचा एक विजय आहे. ज्या कोणीही शब्द देऊन दगाबाजी केलीय, त्यांची यादी आमच्याकडे आहे. त्यांनी नावं आमच्याकडे आहेत. आम्हाला माहितीय कोणी मतं दिली नाहीत. पण ठीक आहे आपण पाहूयात, असंही संजय राऊतांनी सांगितलंय.
सुहास कांदेचं मत का बाद केलं आणि कोणत्या कारणासाठी बाद केलं हा एक निवडणूक प्रक्रियेतला संशोधनाचा विषय आहे. सुहास कांदे यांचं मत ज्या कारणासाठी बाद झालं, त्याच कारणासाठी आम्ही सुधीर मुनगंटीवारांच्या मताला आक्षेप घेतला आहे. प्रत्यक्ष मतदान करत असताना कोणत्याही प्रकारचं धार्मिक प्रदर्शन करायचं नसतं, अमरावतीचे शहाणे जे काही उद्योग करत होते, त्यांचं मत घटनेनुसार बाद व्हायला हवं. पण फक्त आमचं मत बाद करून पहाटे ज्या काही गोष्टी करण्यात आल्या, यांना पापकृत्य करण्याची पहाटेची फार सवय आहे, त्या उपक्रमाला आमच्या शुभेच्छा आहेत, तुम्ही असेच उपक्रम करत राहा आणि महाराष्ट्राचा एकदाचा कायमचा घोडेबाजार करून टाका.