ED अधिकाऱ्यांवरील संजय राऊतांच्या गंभीर आरोपांवर मुंबई पोलिसांची एसआयटी स्थापन– गृहमंत्री
मुंबई, मंडे टू मंडे वृत्तसेवा : ईडी अधिकाऱ्यांवर निशाणा साधत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ईडीचे अधिकारी वसुली करत असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. त्यांच्या या आरोपानंतर आता या आरोपांचा तपास करण्यासाठी एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली आहे. ‘मुंबई पोलीस या प्रकरणाच तपासासाठी एसआयटी नेमण्यात आली असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे.
ईडी अधिकारी खंडणी रॅकेट चालवत असलेल्या या संजय राऊतांच्या गंभीर आरोपांचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या एसआयटीचं नेतृत्व अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) वीरेश प्रभू तपासाचे नेतृत्त्व करत असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. त्यांच्या नेतृत्त्वात या प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे. त्यांना तपासासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा देण्यात येईल, अशी माहिती
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज जनता दरबारसाठी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात आले असता विविध प्रश्नांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अलीकडच्या काळामध्ये भडकाऊ भाषणे करून समाजासमाजामध्ये तेढ व संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. ही बाब राज्याच्या व देशाच्या एकतेच्या दृष्टीकोनातून बरोबर नाहीय यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.