क्राईमचाळीसगाव

गुटखा तस्करावर मोठी कारवाई : वाहतुक करणारे कंटेनर जप्त !

चाळीसगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या दोन तारखेला भुसावल येथे तीन कंटेनर मधून २ कोटी २७ लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला ही घटना ताजी असताना चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी आज सुमारे  ६० लाख ते एक कोटीचा गुटखा असलेचे शक्यता असून कंटेनर पकडल्याने गुटखा तस्करामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी की, चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी एच.आर. ३८ एबी ६०९६ हा क्रमांक असलेला कंटेनर जात असता संशय आल्याने पाठलाग करून कंटेनरची अधिक तपासणी केली असता त्यात लाखो रुपयांचा गुटखा  कोटींचा गुटखा असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या घटनेने गुटखा तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कोटीने गुटखा पकडला जात असूनही इतका गुटखा येतो कुठून, गुटख्याची पोळमुळे जिल्ह्यात किती रुजली आहेत हे यावरून लक्षात येते.याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करणे सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!