इयत्ता बारावी पर्यंत मराठी विषय अनिवार्य करा.जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कुंभारखेडा. ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. योगेश कोष्टी |महाराष्ट्रात मराठी विषय इयत्ता बारावी पर्यंत सक्तीचा करण्याचा शासन निर्णय १३ सप्टेंबर २०२४ रोजी पारित झाला. या आदेशाची अंमलबजावणी शासनाने येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०२५-२६) करावी यासाठी जळगाव जिल्हा मराठी विषय महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुधाकर ठाकूर यांच्या नेतृत्वात जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतांना जळगाव जिल्हा मराठी विषय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. सुधाकर ठाकूर, सल्लागार प्रा. राजेश कोष्टी, कोषाध्यक्ष प्रा. किरण कुमार पाटील, प्रा.शितल चौधरी, प्रा.ज्योती मोरे तसेच मराठी विषय शिक्षक उपस्थित होते.
मराठी विषय हा सर्व विद्या शाखांमध्ये अनिवार्य करावा या आदेशाची अंमलबजावणी अजून झालेली नाही. त्यासाठी
जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसेच मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत यांना लेखी निवेदनाद्वारे विनंती केली आहे.