भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

मराठा आरक्षण : रावेर तालुक्यात आनंदोत्सव

रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्याने रावेर तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने जल्लोष व आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी महायुती सरकारचे आणि महाराष्ट्राचे जाणते मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस तसेच उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

रावेर-यावल मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार अमोल दादा जावळे यांचेही आज हा ऐतिहासिक निर्णय प्रत्यक्षात आला असून, त्याबद्दल कार्यकर्त्यांनी आमदारांचेही विशेष आभार मानले.


या आनंदोत्सवात भाजपा ज्येष्ठ नेते सुरेश दादा धनके, गोमतीताई बारेला, पद्माकर भाऊ महाजन, सुनील भाऊ पाटील, सी. एस. पाटील सर, नितीन भाऊ पाटील, पि. के. महाजन, तिन्ही मंडळाचे तालुकाध्यक्ष अँड. प्रा. सूर्यकांत देशमुख, रविभाऊ पाटील, दुर्गेश पाटील, अजबराव दादा पाटील, धनलाल पवार, सिकंदर तडवी, निलेश सावळे, शुभम पाटील, रवी महाजन, स्वप्निल सोनवणे, नंदकिशोर चव्हाण, जगदीश पाटील, राहुल महाजन, सनी पाटील, उमाकांत महाजन सर, पवन पाटील, जयंत कुलकर्णी सर, जयेश पाटील, गोंडू महाजन पाटील, सोपान दादा पाटील, जगदीश घेटे, कपिल पाटील आदींसह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!