भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावसामाजिक

जळगाव मध्ये सकल हिंदू समाजाचा जन आक्रोश मोर्चा, जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद

जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदू यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात संपूर्ण देशभरात सकल हिंदू समाजातर्फे आज सर्व घटनेचा निषेध म्हणून जिल्ह्यात सर्वत्र बंद पुकारण्यात आल्याने सर्व व्यावसायिकांनी बंद ठेऊन यात सहभागी झाले . याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे काढण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

सकल हिंदू समाजातील सर्व व्यापारी मंडळ, फुले मार्केट, गोलाणी मार्केट, बि.जे मार्केट , दाणा बाजार , गांधी मार्केट, शहरातील सर्व छोटे मोठे व्यापारी संकुल, एमआयडीसी परिसरातील लघुउद्योग भारती, जिंदा ,भाजप उद्योग आघाडी तसेच जिल्ह्यातील विविध व्यापारी व विक्रेते संघटना तसेच शाळा महाविद्यालय , कोचिंग क्लासेस , फुटपाथ विक्रेते, सर्वांनी एकमताने या घटनेचा निषेध म्हणून एक दिवस कडकडीत दुकाने व व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने बंद शंभर टक्के यशस्वी झाला.

सकाळी साडेनऊ वाजता सुभाष चौक येथील भवानी माता मंदिर परिसरात मोठ्या संख्येने हिंदू समाजातील विविध संघटनेतील व्यक्तींनी एकत्र येऊन भवानी मातेची आरती करण्यात येऊन त्यानंतर सकाळी १०.३० शांततेत मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्च्याची सुरुवात सुभाष चौक – दाना बाजार-टॉवर चौक ,शिवतीर्थ हेडगेवार चौक, स्वातंत्र्य चौक तेथून जिल्हाधिकारी कार्यालय येथे नेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेल्या सर्व हिंदू बांधवांना महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांनी संबोधित केले.
आज जी परिस्थिती बांगलादेशात होत आहे तीच परिस्थिती भारतात व्हायला वेळ लागणार नाही. यासाठीच या देशातला हिंदू हा जातीपातीमध्ये वर्ग न होता एकत्रितपणे संघटित राहणं खूप गरजेचं आहे. असे ते यावेळी म्हणाले.

राष्ट्रपतींना जिल्हाधिकारी जळगाव यांचे मार्फत निवेदनाद्वारे मागणी
भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंना वाचवण्यासाठी योग्य ती पावले उचलावी.,बांगला देशातील भयावह परिस्थितीमुळे सीमेवर जमलेल्या हिंदू बांधवांसाठी भारत सरकारने छावण्या सुरू कराव्या, गेल्या काही दिवसापासून देशात सुद्धा काही जिहादी मानसिक ते मुळे देशात असे कृत्य घडताना निदर्शनात येत आहेत या अशा विकृतींवर कठोर कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

भारताचे राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी जळगाव यांच्याद्वारे निवेदन सादर करण्यात आले. निवेदन सादर करताना महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज फैजपूर, ह.भ.प गजानन महाराज वरसाडेकर, ह.भ.प समाधान महाराज भोजेकर, ह.भ.प दीपक महाराज, विहिंप चे प्रांत सहमंत्री ललित चौधरी, जिल्हाध्यक्ष हरीश मुंदडा, रा.स्व.सं विभाग कार्यवाह अविनाश नेते , शहर संघ चालक उज्वल चौधरी , राकेश लोहार, अनिल अडकमोल , अमित भाटिया, डी. एन. तिवारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!