ब्रेकिंग : बेकायदेशीर तेल शुद्धीकरण कारखान्यात मोठा स्फोट, १०८ हून अधिक लोकांचा मृत्यू
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l बेकायदेशीर तेल शुद्धीकरण कारखान्यात मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. नायजेरियन अधिकाऱ्यांनी या स्फोटात १०८ हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. तसेचअनेक जण गंभीर जखमीही झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून ही घटना दक्षिण नायजेरियातील इमो राज्यात घडल असून इमोचे पेट्रोलियम संसाधन आयुक्त गुडलक ओपिया यांनी सांगितले की, सरकारी मालकीच्या एग्बेमा येथील बेकायदेशीर तेल पशुद्धीकरण कारखान्यात रात्री उशिरा स्फोट झाला. यात ५० हून अधिक गुरांचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
बेकायदेशीर तेल शुद्धीकरण कारखान्याच्या संचालकाला सरकारने यापूर्वीच फरारी घोषित केले आहे. स्थानिक अधिकारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना परिसरात सर्वत्र विखुरलेले, जळलेले मृतदेह आढळले.
नायजेरियामध्ये तेल पाइपलाइनमध्ये छेडछाड आणि तेल चोरीच्या घटना नेहमीच घडत असतात. तेल कंपन्यांच्या मालकीच्या पाइपलाइनमधून कच्चे तेल चोरून अशा बेकायदेशीर तेल शुद्धीकरण कारखाने चालवले जातात. हे रिफायनरीमधून साफ केल्यानंतर सुधारित टाक्यांमध्ये गोळा केले जातात. त्यामुळे अनेकवेळा मोठे अपघात घडत असतात.