यावल तालुक्यातील “त्या” खून प्रकरणात अल्पवयीन तरुणी पोलिसांच्या ताब्यात
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | २९ ऑगस्ट रोजी यावल तालुक्यातील दहिगाव शिवारात खिरवा नाल्यावर इम्रान युनूस पटेल(२१, रा. हनुमंतखेडा, ता. धरणगाव) या तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने रात्री खून करण्यात आला होता. याप्रकरणी २९ ऑगस्ट रोजी रात्रीच गजानन रवींद्र कोळी व ज्ञानेश्वर गजानन पाटील (वय १९) ही दोघे मारेकरी आरोपी स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाले. त्या नंतर पुढील तपासात तिसरा आरोपी यावल शहरातून तर चौथी अल्पवयीन मुली कडे या संदर्भात तपास सुरू होता. या खून प्रकरणात आणखी काही आरोपी असल्याची चर्चा दहिगाव परिसरात सुरू होती. पोलिस तपासात या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागलं असून या खून प्रकरणात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे.

खून झालेल्या मयत तरुण इम्रान याने तिच्या प्रेमसंबंधांची माहिती तिच्या पालकांना दिली होती. आणि याच रागातून तिनेच संशयितांना खुनासाठी चिथावणी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले.
यावल तालुक्यातील दहिगाव येथील सुरेश आबा नगरातील रहिवासी इम्रान पटेल वय २१ वर्षे .याचा दि. २९ ऑगस्ट रोजी रात्री यावल तालुक्यातील दहिगाव शिवारात खिरवा नाल्यावर खून झाला होता. याच्या हत्येप्रकरणी गजानन रवींद्र कोळी व ज्ञानेश्वर गजानन पाटील (वय १९) हे स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाले .होते. त्यानंतर तिसरा आरोपी तुषार राजेश लोखंडे यास पोलीस पथकाने यावल शहरातून अटक कारण त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती. याबाबत नागपूर येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीकडे चौकशी सुरू होती. सखोल तपासानंतर पोलिस तपासात दहिगाव येथील १६ वर्षीय अल्पवयीन बालिकेचा या खुनाशी संबंध असल्याचे उघडकीस आले. तपासादरम्यान तिच्या विरोधात पुरावे मिळाले. पुराव्यावरून पोलिसांनी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. तिनेच वरील दोघांना खुनासाठी चिथावणी दिल्याचे तपासात उघड झाले आहे.
अल्पवयीन मुलीला जळगाव येथील विशेष बाल न्याय मंडळासमोर हजर केले असता तिला बाल अधिरक्षा कक्षात ठेवण्यात आले आहे. या गुन्ह्यातील तिघं संशयित न्यायालयीन कोठडी आहे. पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळेच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

