आरोग्यबुलढाणामहाराष्ट्र

चमत्कार : तीन दिवसांच्या नवजात बाळाच्या पोटातून काढली चक्क दोन बाळं

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एक विचित्र आणि चमत्कारिक घटना बुलढाण्यात घडली. एका महिलेच्या पोटात असलेल्या बाळाच्या पोटात चक्क दोन अर्भक असल्याचं आढळून आलं होतं. आज या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या बाळाच्या पोटात एक अर्भक असल्याचं डॉक्टरांनाही वाटलं होतं. पण ऑपरेशन करताना या बाळाच्या पोटात एक नव्हे तर चक्क दोन अर्भकं निघाली. अमरावतीच्या संदर्भ रुग्णालयातील डॉक्टरांनी खूप गुंतागुंतींची शस्त्रक्रिया केलीय. ही शस्त्रक्रिया म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील चमत्कार मानला जात आहे. डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून ही दोन्ही अर्भके काढली आहेत. मात्र, पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याने डॉक्टरही हैराण झाले आहेत. ही महिला आणि बाळ दोन्ही सुखरूप असल्याचं सांगण्यात आलं आहे.

बुलढाण्यातील तीन दिवसाच्या पुरुष जातीच्या नवजात बाळावर आज अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या बाळाच्या पोटात एक नव्हे तर दोन अर्भकं निघाली. ही दोन्ही अर्भके तीन इंचाची होती. विशेष म्हणजे या बाळाच्या पोटातील दोन्ही अर्भकांनी मानवी आकार घेतला होता. शरीर तयार झाली होती. मात्र, ५ डॉक्टर, ४ नर्स आणि इतर कर्मचारी अशा १२ जणांचा स्टाफ ऑपरेशनच्या तयारीला लागला होता. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नामुळे या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया करून दोन्ही अर्भके काढण्यात आली आहेत.


विशेष म्हणजे पुरुष जातीच्या नवजात बालकाच्या पोटातून दोन अर्भके निघण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. या बाळाचं यशस्वी ऑपरेशन करणं हे डॉक्टरांसाठीही आव्हानच होतं. पण डॉक्टरांनी हे आव्हान पेललं आणि नवजात अर्भकांचं यशस्वी ऑपरेशन केलं. डॉ. उषा गजभिये यांच्या नेतृत्वात हे ऑपरेशन यशस्वी झाले. या ३ दिवसांच्या बाळासाठी अमरावतीतील डॉक्टर देवदूत ठरले. असं म्हणणे वावगे ठरणार नाही.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!