भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावपाचोरा

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात पीक नुकसान अनुदान वाटपात १ कोटी २० लाखांचा अपहार, गुन्हा दाखल

जळगाव,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यात पीक नुकसान अनुदान वाटपासाठी शासनाकडून प्राप्त झालेल्या रकमेतून सुमारे एक कोटी २० लाख १३ हजार ५१७ रुपयांचा अपहार केल्याचे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात उघडकीस आले. या प्रकरणी तत्कालिन महसूल सहायक अमोल भाई व त्यांचा साथीदार गणेश चव्हाण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांच्या विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा येथे तहसील कार्यालयात अमोल भोई हा महसूल सहायक म्हणून कार्यरत असताना भोईने स्वतःचा आर्थिक लाभ करण्याच्या हेतूने २०२२-२३ आणि २०२४-२५ या दोन वर्षांच्या कालावधीत पाचोरा तालुक्यातील काही गावांमधील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बनावट याद्या तयार केल्या. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सुमारे एक कोटी २० हजार १३ हजाराची रक्कम जमा केली. त्या नंतर महसूल सहाय्यक अमोल भोईने ज्यांच्या नावावर पीक नुकसान भरपाईचे पैसे जमा केले होते, त्या शेतकऱ्यांशी नंतर वैयक्तिक संपर्क साधून संबंधितांकडून त्यांच्या नावावर जमा झालेले पिक नुकसान भरपाईचे पैसे ताब्यात घेतले.

मात्र हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर महसूल सहायक अमोल भोई आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी गणेश चव्हाण यांच्या विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही तहसीलदार विजय बनसोडे यांच्या तक्रारीवरून करण्यात आली.

दरम्यान, राज्य शासनाकडून नैसर्गिक आपत्तीमुळे २०२२-२३ आणि २०२४-२५ या दोन वर्षात ३४७ बाधित शेतकऱ्यांसाठी भरपाईची रक्कम आली होती. मात्र, बनावट याद्या तयार करुन ही रक्कम पात्र नसलेल्या तसेच शेती नावावर नसलेल्या व्यक्तींच्या नावावर टाकण्यात आली. पुढे बनावट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम परस्पर काढून ती स्वतःसाठी वापरल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

जून ते ऑक्टोबर-२०२२ या कालावधीतील खोट्या आणि बनावट पंचनाम्यांच्या आधारे वाटप झालेल्या अनुदानाच्या काही याद्या अद्याप तपासलेल्या नाहीत. त्यामुळे भोईने अपहार केलेल्या रकमेचा आकडा आणखी वाढू शकतो. जून ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत बनावट दस्ताऐवज तयार करून ते पंचनाम्यात जोडण्यात आले आहेत.अमोल भोई व युवा प्रशिक्षणार्थी गणेश चव्हाण यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये पंचनामेच्या नोंदणींमध्ये खोटे व बनावट शासकीय दस्तावेत तयार केले त्यासाठी शासकीय कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी कुठे यांच्या वापर केला व यांनी शासनाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तहसीलदारांच्या लॉगिन आयडी व पासवर्डचा गैरवापर केला.

पीक नुकसान भरपाईचे अनुदान गेल्या महिन्यात खात्यात जमा झाले नाही, अशी अनेक शेतकऱ्यांची तक्रार होती. या तक्रारीनंतर लाभार्थ्यांची मूळ यादी ग्रुपवर शेअर करण्यात आली. तेव्हा महसूल सहाय्यक अमोल भोई यांनी संबंधित लिपिकाला “यादी अपलोड करू नका, माझ्याकडे खरी यादी आहे” असे सांगितले. मात्र, लिपिकाने त्याचे न ऐकता यादी अपलोड केली आणि त्यातून भोई याने केलेला गैरव्यवहार उघड झाला. आंबे वडगाव येथील तलाठ्यांनी या यादीची प्रत चावडीवर लावली असता, लाभार्थ्यांची नावे आणि आधार क्रमांक पूर्णपणे वेगळे असल्याचे स्पष्ट झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळायला हवे होते, ते पैसे इतर गावातील लोकांना दिले गेल्याचे आढळून आले. त्यानंतर सर्व गावांतील याद्यांची तपासणी सुरू झाली आणि मोठा घोटाळा उघडकीस आला. चौकशीसाठी बोलावल्यावर अमोल भोई यांनी या गैरव्यवहाराची कबुली दिली. अशा प्रकारे हा अपहाराचा गुन्हा उघडकीस आला. असाच प्रकार जिल्ह्यात अनेक ठिकाणी झालेला असल्याची माहिती मिळत असून संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील पीक नुकसान भरपाईचे अनुदानाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!