‘त्या’ एका मतावरून वाद : मत बाजूला काढले, मतमोजणीत राष्ट्रवादी-भाजप आमनेसामने !
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला अखेर सुरुवात झाली आहे. मतमोजणीसुरू होण्याआधी राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांचं एक मत बाद करण्याची मागणी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आक्षेप घेत मागणी केली आहे मात्र हे मत बाजूला ठेवण्यात आले आहे.
काँग्रेसने घेतलेला आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे. त्यानंतर आता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. 10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात असल्यामुळे त्यातच गुप्त मतदान असल्यामुळे कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार याची कमाली उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
अखेरीस दोन तासांच्या विलंबानंतर मतमोजणीला सुरुवात झाली. 285 आमदारांची मत वैध ठरली आहे. एकाही आमदाराचे मत बाद झाले नाही. मतमोजणी सुरू झाली असून राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. रामराजे निंबाळकर यांचं एक मत बाद करण्याची मागणी केली आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला आहे. एका मतावर पेनाने खाडाखोड केली आहे. मात्र, हे मत अधिकाऱ्यांनी बाजूला काढण्यात आले असून त्याचा निर्णय नंतर घेण्यात येणार आहे. यामुळे या मतांमुळे कुणाचा गेम होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.