मुक्ताईनगरात निकालाआधीच एकनाथ खडसेंच्या विजयाच्या अभिनंदनाचे बॅनर
मुक्ताईनगर, अक्षय काठोके : विधान परिषद निवडणुकीच्या निकाला आधीच म्हणजेच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या विजयाच्या घोषणे आधीच मुक्ताईनगर शहरात त्यांच्या अभिनंदनाचे फलक लावण्यात आले आहे.
- शाळांच्या दिवाळी सुट्टीचे वेळापत्रक जाहीर; शिक्षण विभागाचे परिपत्रक प्रसिद्ध! २ ते १४ नोव्हेंबर दरम्यान सुट्टी; १६ नोव्हेंबर पासून दुसरे सत्र सुरू
- मुंबई-अयोध्या अमृत भारत एक्स्प्रेस सुरू! भुसावळसह “या ” स्थानकांवर थांबा ! मुंबई ते अयोध्या दरम्यान २४ साप्ताहिक फेऱ्या
- गावठी कट्टा व चार काडतुसांसह सुरत मधील सराईत गुन्हेगाराला अटक; ८.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
काही तासांमध्ये याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली असून यासाठी मतदान झाले आहे. याआधीच मुक्ताईनगरात शहरात समर्थकांमध्ये विजयाचा आत्मविश्वास दिसत असून शहरात निकाल लागण्याआधीच नाथाभाऊंच्या अभिनंदनाचे फलक ठिकठिकाणी लागले आहेत.





