भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज ठाकरेच्या इशाऱ्यानंतर स्पीकरवर हनुमान चालिसा सुरू, मनस आक्रमक !

मुंबई, मंडे टू मंडे वृत्तसेवा : मशिदीवरील बेकायदा भोंगे उतरवा अन्यथा आम्ही हनुमान चालिसा लावू असा इशारा कालच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर मनसे सैनिक आक्रमक झाले आहेत. घाटकोपरमध्ये मनसे सैनिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयावर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा सुरू केला आहे. दिवसभर लाऊडस्पीकरवरून हनुमान चालिसा लावला जाणार असल्याचं मनसेने म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकाने बेकायदा भोंगे उतरवायचे आदेश द्यावेत असे राज ठाकरे यांनी मागणी केली होती.

आम्ही आमच्या कार्यालयावर हनुमान चालिसा सुरू केला आहे. अजानमुळे जर धार्मिक तेढ निर्माण होत नाही तर हनुमान चालिसा सुरू केल्याने वातावरण कसे काय बिघडू शकते? असा सवाल मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. घाटकोपरच्या पश्चिमेकडील चांदिवली येथे मनसेच्या शाखेवर लाऊडस्पीकर सुरू करून हनुमान चालिसा सुरू करण्यात आला आहे. मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वात हे लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा सुरू करण्यात आला आहे. कालच्या भाषणातील राज यांचं आवाहन ऐकूनच हे भोंगे लावून हनुमान चालिसा सुरू करण्यात आला आहे.

दिवसभर हनुमान चालिसा लावण्यात येणार असल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. राज ठाकरे यांचा आदेश. मनसे कार्यकर्ता म्हणून आदेशाचं पालन करणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मी आजपासून सुरूवात केली आहे. रोज भोंगे वाजणार आहेत. त्यावर हनुमान चालिसा, गायत्री मंत्र, गणपतीची आरतीसह हिंदू धर्माशी निगडीत सर्व आरत्या या ठिकाणी वाजणार आहेत. तणाव कशाला होणार? हा धार्मिक कार्यक्रम आहे. त्यांची अजान होते. त्याने तणाव झाला का? नाही ना? हिंदू धर्माची आरती वाजली तर तणाव का? असा प्रश्नच का? आम्ही आमच्या धर्माचा प्रसार करतो, असं मनसेचे पदाधिकारी महेंद्र भानुशाली यांनी सांगितलं. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेप करत स्पीकर खाली उतरवण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!