भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

मंडे टु मंडे न्युज इम्पॅक्ट; अखेर मुक्ताईनगर करांनी घेतला मोकळा श्वास, जीव घेण्या अवजड वाहनापासून मुक्तता

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज अक्षय काठोके | मुक्ताईनगर शहरातून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने जात होती .प्रवर्तन चौकात वाहतुकीची कोंडी होत होती. नागरिक, शाळकरी मुलांना जीव मुठीत घेऊन फिरावे लागत होते. या मोठमोठ्या कंटेनर मुळे लहान मोठे अपघात घडत होते. व पुढे मोठे अपघात घडण्याची मोठी शक्यता लक्षात घेता ” मंडे टु मंडे न्युज ” ने या संदर्भात बातमी प्रसिद्ध केली होती.

या वृत्ताची दाखल घेत बोदवड चौफुली मी व पुरणाड फाट्यावरती दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या मुळे अखेर मुक्ताईनगर करांनी मोकळा श्वास घेत मुक्ताईनगर करांना जीव घेण्या अवजड वाहनापासून मुक्तता मिळाली आहे.

याबाबत अधिकृत असे की संभाजीनगर कडून येणारे अवजड वाहने बोदवड चौफुली वरून मुक्ताईनगर शहरात येत असल्यामुळे मुक्ताईनगर शहरात व प्रवर्तन चौकात वाहतुकीची कोंडी होत होती तसेच नागरिक, शाळकरी मुलांना जीव मुठीत घेऊन फिरावे लागत होते या मोठमोठ्या ट्रक कंटेनर मुळे छोटे-मोठे अपघात दररोज घडत होते व यातून एखादी मोठा जीव घेणा अपघात सुद्धा होण्याची शक्यता होती याबाबत दोन दिवसा आधी “मंडे टू मंडे न्यूज” ने “मुक्ताईनगर शहरात अवजड वाहतुकीचा प्रश्न एरणीवर प्रशासन मोठा अपघात घडण्याचा प्रतीक्षेत आहे का?” असे वृत्त प्रकाशित झाले होते. या वृत्ताची दखल घेत नवनियुक्त पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी आज पासून बोदवड चौफुली व पुरणाड फाट्यावरती दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!