भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्रराजकीय

Nawab Malik : मलिकांच्या अडचणीत वाढ : नवाब मलिकांचे डी-गँगशी संबंध– कोर्ट

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांखाली तुरुंगात असलेले महाविकास आघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना न्यायालयाने मोठा दणका दिलाय. विशेष न्यायालयाने मलिकांविरुद्धच्या खटल्यावर सुनावणी करताना ईडीने सादर केलेल्या दोषारोपपत्राची दखल घेतली. नवाब मलिक हे जाणूनबुजून आणि थेट मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचं निरीक्षण यावेळी न्यायालयाने नोंदवलं. नवाब मलिकांचे डी-गँगशी संबंध होते. नवाब मलिकांनी मनी लाँड्रिंग केल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. यामुळेच मलिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ईडीनं (ED) दाखल केलेल्या आरोपपत्राची मुंबई सत्र न्यायालयानं दखल घेतली आहे. या आरोपपत्रात तपासयंत्रणेनं मलिकांविरोधात मनी लाँड्रिंगमध्ये समाविष्ट असल्याचा आरोप केलेला आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी मलिकांविरोधात या गुन्ह्यात सामील असल्याचे पुरावे असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं आहे. नवाब मलिक हे हसीना पारकर, सलीम पटेल, सरदार शहावली खान यांच्या संपर्कात असल्याचीही माहिती आहे. तर डी-गँगशी संबंध ठेवूनच मलिकांनी गोवावाला कंपाऊंडची जागा मिळवली, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी या आरोपपत्राची दखल घेताना स्पष्ट केलं की, नवाब मलिक यांनी डी कंपनीशी संबंधित असलेल्या हसिना पारकर, सलीम पटेल, सरदार खान यांच्यासोबत मनी लाँड्रिंगसाठीच गोवावलाल कंपाऊंडच्या अफरातफरीचा हा कट रचला. ज्यातनं या सर्वांनी मोठा आर्थिक घोटाळा करून बेहिशेबी मालमत्ता जमवली. “नवाब मलिक यांचे दाऊद टोळीच्या सदस्यांशी थेट संबंध होते याचे सकृतदर्शनी पुरावे दिसतायत, त्यामुळे हा खटला पुढे सुरु ठेवण्यासाठी हे पुरावे पुरेसे आहे,” असे न्यायालयानं म्हटलं आहे.

ईडीच्या आरोपपत्रानुसार, हसीना पारकरचा मुलगा अलिशान यांनं कबूल केलंय की हसमीन पारकर ही साल 2014 मधील तिच्या मृत्यूपर्यंत दाऊद इब्राहिमचे इथले सर्व आर्थिक व्यवहार सांभाळायची. त्यांन हेदेखील कबूल केलंय की, हसीना पारकरनं सलीम पटेलच्या साथीनं गोवावाला कंपाऊंडाच वाद मिटवला होता. त्यानंतर कालांतरानं ही सारा मालमत्ता नवाब मलिकांना विकण्यात आली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!