भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमराष्ट्रीय

मंत्र्यांशी संबंधित नोकराच्या घरात घरभर ५०० च्या नोटांचे ढीग! नोटा मोजण्याचे काम सुरूच..

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत .त्यातच ईडी ने झारखंडमधील सेल सिटीसहीत अनेक ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झारखंडचे ग्रामविकासमंत्री आलम गिर यांचे स्वीकिय सचिव असलेल्या संजीव लाल यांच्या घरी काम करणाऱ्या नोकरच्या घरात बँगांमध्ये भरुन ठेवलेले नोटांचे बंडल सापडले आहेत.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी या नोकऱ्याच्या घरावर छापा मारला तेव्हा त्याच्या घरात आढळून आलेल्या अनेक छोट्या-मोठ्या आकारांच्या बॅगांमध्ये ५०० – ५०० च्या नोटांचे बंडल भरुन ठेवण्यात आल्याचं उघड झालं. तपास अधिकाऱ्यांनी एक एक करुन या सर्व बॅगा घरातच रिकाम्या केल्या. त्यानंतर या ठिकाणी सापडलेल्या पैशांची संख्या पाहता नोटा मोजणारी मशिन आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आलं असून सध्या नोटा मोजण्याचं काम सुरु आहे.

हा सारा काळ्या कमाईमधून कमावलेला पैसा असून हा पैसा या नोकराच्या घरी कुठून आला? त्याला एवढ्या मोठ्याप्रमाणात कॅश संभाळण्यासाठी कोणी दिली? या प्रकरणामधील खरा सुत्रधार कोण आहे? या साऱ्या गोष्टींचा आता ईडीकडून तपास केला जात आहे. पोलिसांनी सध्या या प्रकरणात मंत्र्याच्या पीए लाच च्या नोकरला तब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. ही रक्कम २५ कोटींच्या आसपास असेल असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी नोटांची मोजणी पूर्ण होईपर्यंत नेमका आकडा सांगता येणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.गेल्या काही आठवड्यांपूर्वीच ईडीने झारखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात कारवाई केली होती. मनी लॉन्ड्रींग प्रकरणामध्ये हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली. सध्या हेमंत सोरेन हे ईडीच्या ताब्यात असून अटकेआधी त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!