भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

पाच वर्षीय बाळासह आई व मावशीचा तापी नदी पात्रात बुडून मृत्यू

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | तापी नदीपात्रात बुडणाऱ्या बालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याची आई व मावशी यांच्यासह तीन जण बुडून मरण पावल्याची हृदयद्रावक व दुर्दैवी घटना यावल तालुक्यातील अंजाळे येथे घडली. या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील अंजाळे येथील घाणेकर नगरात बादल लहू भील वय २३ वर्ष. हा युवक रहात असून तो जेसीबी ऑपरेटर म्हणून काम करतो. खंडोबाचा जागरणाचा काल गोंधळाचा कार्यक्रम असल्याने त्या निमित्त त्यांच्या बहिणींसह आप्त नातेवाईक घरी आलेले होते. त्यात त्यांची मावस बहिण वैशाली सतीश भील ( रा. अंतुर्ली, ता. अमळनेर ) आणि मामे बहिण सपना गोपाळ सोनवणे (रा. पळाशी, ता. सोयगाव ) याही आलेल्या होत्या.

जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाल्यानंतर आज दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ते तापी नदीवर आंघोळीसह कपडे धुण्यासाठी गेले. याप्रसंगी वैशाली सतीश भील यांचा मुलगा नकुल ( वय ५ वर्षे ) हा अचानक पाय घसरून पाण्यात पडल्याने गटांगळ्या खाऊन बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी त्याची आई वैशाली भील आणि मावशी सपना सोनवणे या दोघींनी पाण्यात उडी मारली. मात्र दुर्दैवाने या दोन्ही बहिणींना पोहता येत नसल्याने हे तिन्ही जण पाण्यात बुडाले.

दरम्यान, यांच्यासोबत नदीवर गेलेल्या अनु सतीश भील या बालिकेने घरी धावत येऊन याची माहिती दिली. यानंतर पोहणाऱ्यांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना पाण्याबाहेर काढले. मात्र तो पर्यंत फारच उशीर झाला होता. मात्र तो पर्यंत या तिघांवर क्रूरकाळाने झडप घातली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

या दुर्घटनेत अंतुर्ली ता. अमळनेर येथील वैशाली सतीश भील व त्यांचा पाच वर्षाचा मुलगा नकुल तसेच पळाशी येथील सपना गोपाळ सोनवणे या तिघांचा मृत्यू झाला. एकचदा तिघांचा मृत्यू झाल्याने अंजाळे गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!