भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

कोथळी येथे बंद घर फोडत ४ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल लंपास

मुक्ताईनगर, प्रतिनिधी : तालुक्यातील कोथळी येथे बंद घर फोडत कपाटातील ४ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, तालुक्यातील कोथळी येथील रहिवासी असलेले वरणगाव फॅक्टरीत नोकरीला असलेले विनोद धोंडू शिंदे वय-३४ हे कुटुंबासह दिवाळीनिमित्त घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, टाटा स्काय कंपनीचा सेटटॉप बॉक्स आणि ९० हजार रुपयांची रोकड असा एकूण ४ लाख ८३ हजार १७० रुपयांचा ऐवज चोरी केल्याची घटना समोर असून याप्रकरणी विनोद शिंदे यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परविन तडवी करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!