चक्री वादळ व गरपीट मुळे झालेल्या नुकसान भरपाई बाबत कृषी मंत्री दादा भुसें च खडसेंना आश्वासन
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे वृत्तसेवा : मागील काही दिवसापूर्वी उंचदा परिसरात भयानक चक्री वादळ व गरपीट मुळे केळी पीक भुईसपाट होऊन कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले होते. त्याच पाश्र्वभुमीवर महाराष्ट्र राज्यचे विरोधी पक्षनेते, जिल्हाचे पालकमंत्री, आदी लोकप्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष पाहणी करत पंचनामा करुण शासनाच्या दरबारी ठेवले असुन सुध्दा यावर कुठला निर्णय अघापही झालेला नाही.
आज उचंदा येथील शेतकरी, बांधव राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे पदाधिकारी माजी मंत्री एकनाथराव खडसे यानां आपले प्रश्न माडले याप्रकरणी खडसे यांनी कुषी मंत्री दादा भुसे यांना दुरध्वनी वरून संपर्क साधून शेतकरी यांचा विषय मांडला कुषी मंत्री दादा भुसे यांनी 15 दिवसात विषय मार्गी लावतो असे आश्वासन दिले. या वेळी उंचदा परीसरातले शेतकरी बांधव राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे पदाधिकारी जिल्हा सरचिटणीस ईश्वर राहणे,सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील,ता अध्यक्ष युडी पाटील सर, माजी सभापति सुधाकर पाटील, जगन्नाथ पांडुरंग पाटील , ओबीसी तालुका अध्यक्ष साहेब राव सिंगतकर ,युवक ता अध्यक्ष शाहिद खान, ता सरचिटणीस रविंद्र दांडगे ,गोपाळ सिताराम पाटील , विनायक लक्ष्मण पाटील, प्रकाश काशीनाथ पाटील, राजेंद्र गजमल पाटील, साहेबराव ओंकार पाटील, शांताराम आत्माराम पाटील , साहेबराव किसन पाटील, बंडु त्रबंक पाटील, जितेंद्र गजमल पाटील आदी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.