मुक्ताईनगर : प्रभाग १५ मधून सौ. सविता सुभाष भलभले यांच्या उमेदवारीची घोषणा ; प्रभागात उत्साहाचे वातावरण
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १५ मधून सौ .सविता सुभाष भलभले यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर स्थानिक स्तरावर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शहरातील शिवसेना शहर संघटक वसंत सुभाष भलभले यांच्या मातोश्री सौ .सविता भलभले या यापूर्वीही प्रभागातून निवडणूक लढविल्यामुळे त्या स्थानिक नागरिकांमध्ये ओळखशीर आहेत.
गेल्या पाच वर्षांत प्रभागातील विविध समस्या सोडविण्यासाठी केलेल्या कामांचा उल्लेख स्थानिक पातळीवर होत आहे. यात गटारी, रस्ते, विद्युत सुविधा, महिलांच्या अडचणी यांसह सर्वात महत्त्वाची पाणी समस्या—यावर टँकरद्वारे घरोघरी पाणीपुरवठा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच कामगार योजनेत गरजूंना भांडी व पेट्या वाटपासह इतर उपाययोजनाही राबविण्यात आल्याचे सांगितले जाते. तसेच त्यांनी कोरोना काळामध्ये केलेल्या जनतेच्या सेवेमध्ये त्यांचे नाव मुक्ताईनगर तालुक्यामध्ये सर्वप्रथम घेण्यात येते. त्यामुळे जनतेचा त्यांच्यावर चांगला विश्वास बसलेला आहे.
प्रभागातील अद्याप प्रलंबित असलेले विकासकामे आगामी काळात पूर्ण करण्याच्या हेतूने सविता भलभले यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याचे कुटुंबीयांनी नमूद केले. नागरिकांनी यापूर्वी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, पुढील काळातही प्रभागाच्या विकासासाठी कार्य करण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे.
