पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा सर्व्हे करून नुकसान भरपाई मिळावी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। गेल्या एक महिन्या पासून मुक्ताईनगर तालुक्यात पाऊसाची संततधार सुरू असुन मोठया प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.महसुल कृषी विभागाच्या मार्फत नुकसानीचे सर्व्हे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मुक्ताईनगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे
मुक्ताईनगर तालुक्यात गेल्या महिन्या भरापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले असून त्यामुळे पिकांची मुळे सडली आहेत सर्व पिके पिवळी पडली असून उडीद मुग ,सोयाबीन ला कोंब फुटले आहेत तर कपाशीवर लाल्या मर असे रोग पडले असून कपाशीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी बांधवांच्या हाताशी आलेले पिक वाया गेले आहेत यात शेतकरी बांधवांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.तरी तहसीलदार यांनी महसुल ,कृषी यंत्रणेला या नुकसानीचे सर्व्हे करण्याचे आदेश द्यावे व शासन दरबारी पाठपुरावा करून शेतकरी बांधवाना मदत मिळवून द्यावी असे निवेदनात नमूद केले आहे.
नायब तहसीलदार प्रदिप झांबरे यांना निवेदन देते वेळी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, जेष्ठ नेते सुधाकर पाटील,तालुका अध्यक्ष यु डी पाटील सर, प्रवक्ता सेल जिल्हा संयोजक विशाल महाराज खोले,युवक तालुका अध्यक्ष शाहिद खान, माफदा तालुका अध्यक्ष रामभाऊ पाटील,सरचिटणीस रवींद्र दांडगे, सुनील काटे, किसान सेल तालुका अध्यक्ष साहेबराब पाटील,शहराध्यक्ष राजु भाऊ माळी, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष शिवा पाटील,बाजार7 समिती संचालक कैलास पाटील, नगरसेवक मस्तान कुरेशी, बापू ससाणे, प्रवीण पाटील,वसंता पाटील,योगेश काळे,कैलास कोळी, रवी पाटील,ललित पाटील, जितेंद्र पाटील,जगन्नाथ पाटील, ओमप्रकाश चौधरी,योगेश बगळे,अजय महाराज तळेले,सुनिल राठोड, धिरसिंग राठोड, शिवशंकर भोलाणकर ,रवी सुरवाडे, भूषण पाटील, रितेश पाटील, इकबार तडवी,विनोद तडवी,गोपाळ पाटील, प्रकाश पाटील, राजेंद्र पाटील,शांताराम पाटील, बंडू पाटील,संदिप तायडे उपस्थित होते