Video|मुक्ताईनगरातील सागर सिड्स दुकानातील बोगस कीटकनाशकाच्या फवारणीमुळे पिकांचे नुकसान– शेतकऱ्यांचा गंभीर आरोप !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर, अक्षय काठोके : दर्जेदार कीटकनाशकांच्या नावावर मुक्ताईनगर तालुक्यातील सातोळ गावातील शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत असून मुक्ताईनगरातील “सागर सिड्स” या नामांकित दुकानातून कीटकनाशक “बोगस’ असल्याचा आरोप पीडित शेतकऱ्याने केला आहे. हे कीटकनाशक बोगस कसे हे सुद्धा दाखवून दिले आहे. मिरची पिकावर फवारणी केली असता लाखो रुपयांची मिरचीचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांची तक्रार घेण्यासाठी कृषी विभागही आर्थिक सेटलमेंट असल्याने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी शेतकऱ्याकडून गट विकास अधिकाऱ्याकडे तक्रार करणयात अली आहे. या शेकऱ्याचा आवाज वरिष्ठ जिल्हा कृषी अधिकाऱ्यांपर्यंत जाऊन दुकांदारावरती कारवाई होईल का ? शेतकऱ्यांचा नुकसाणीमुळे शेतकऱ्याने आक्रोश केला… याबाबत “मंडे टू मंडे” च्या प्रतिनिधीने ग्राउंड झिरो वरून वृतांत खाली बघू शकता…
याबाबत सविस्तर माहिती अशी, मुक्ताईनगरातील सागर सीडस या दुकानातून घेतलेल्या औषधाच्या फवारणीमुळे मिरची पीकाची हानी झाल्यामुळे या दुकानावर कारवाई करावी अशा मागणीचे ८ सप्टेंबर २०२१ रोजी निवेदन विजय माधव कुलकर्णी यांनी गटविकास अधिकार्यांना दिले आहे. मात्र यावर कुठलीच कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांने मंडे टू मंडे शी संपर्क साधून आपली व्यथा मांडली. सदरील शेतकऱ्यांचा म्हणण्यानुसार, त्यांनी २ ऑगस्ट २०२१ रोजी सागर सीडस या दुकानातून बायो आर ३०३ हे औषध घेतले. याची आपल्या सातोड शिवारातील शेतातील मीरची या मिरची पिकावर फवारणी केली. यामुळे पीकावरील रोग नाहीसा होण्याची अपेक्षा होती. मात्र याच्या अगदी उलट काही दिवसांमध्येच मिरचीचे पीक पूर्णपणे नष्ट झाले. या संदर्भात आपण कृषी केंद्रावर माहिती घेतली असता त्यांनी हे बोगस असल्याचे सांगितले त्यातील फरक दाखवला याप्रकरणी कृषी अधिकार्यांकडे तक्रार करून देखील त्यांनी यावर काहीही कार्यवाही केली नाही. यामुळे गटविकास अधिकार्यांनी आपल्या पीकाच्या नुकसानीची पाहणी करून संबंधीत सागर सिड्स या दुकानावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली असून मिळालेल्या माहिती नुसार या दुकानावरती याआधीही कारवाई झाल्याची माहिती काही नागरिकांकडून देण्यात येत आहे. तर तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारी येत असून यावर जिल्हा कृषी अधिकारी यांनी लक्ष घालून कारवाई करतील का ? की शेकऱ्याला आर्थिक नुकसानीच्या बोजाखाले दाबावे लागणार ?