संत मुक्ताबाई पालखीच्या स्वागतासाठी मुक्ताईनगर सजले !
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : महाराष्ट्रातील मानाचा आषाढी वारी संत मुक्ताबाई पालखी सोहळा विठूरायाचे दर्शन घेवून 61दिवसाचा 1400कीमी पायी प्रवास करित स्वगृही आगमन करित आहे. त्यानिमित्ताने भव्य वारकरी सांप्रदायिक दिंडी स्पर्धेचे आयोजन केले आहे मुक्ताईनगर पंचक्रोशीतील ग्रामस्थ व आगमन सोहळा स्वागत समितीचे वतीने अद्भुतपर्व स्वागत करण्यात येणार आहे.
312 वर्षापासून अखंडित जाणारा आषाढी वारी संत मुक्ताबाई पालखी सोहळा संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर ते पंढरपूर परत मुक्ताईनगर जातयेत असतो. परतवारी आगमनाचे स्वागत मुक्ताईनगर कोथळी सालबर्डी हरताळे उचंदे खामखेडा या पंचक्रोशीतील नागरिक भाविकांकडून शहरात जल्लोषात स्वागत करण्यात येत असते. कोरोनामुळे मागील दोन वर्षांत सोहळा साजरा करता आला नाही. यंदा पहिल्या श्रावण सोमवारी पालखी आगमन होत असल्याने भाविकांत प्रचंड उत्साह आहे.तसेच शहर सडारांगोळी, ध्वजपताका, तोरणे, कमानी लावून सजविण्यात येत आहे. दिंडी स्पर्धेत 64भजनी मंडळानी नावे दिली आहेत बाल ,महिला,पुरूष गटासाठी स्वतंत्र बक्षीस ठेवण्यात आली आहे.
सकाळी 10 वाजता नवे मंदिर येथे मान्यवरांचे हस्ते पालखी पूजन होवून दिंडी मिरवणूक स्पर्धा आरंभ होईल. विसावा पादूका,मुक्ताई चौक, बस स्टन्ड, परिवर्तन चौक,भुसावळ रोड,गजानन महाराज मंदिर मार्गे, मुळमंदिरात येईल हभप. रविंद्र महाराज हरणे यांचे काल्याचे कीर्तन व बक्षीस वितरण होईल. मुक्ताईनगर कोथळी,सालबर्डी गावातून 1 लाख पोळ्या महाप्रसाद करीता गोळा करण्यात येणार असून दात्याकडून. शिरा, भात, गंगाफळभाजी असा 15-20हजार भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था केली आहे. तसेच पालखी मार्गात ठिकठिकाणी चहापान अल्पोपाहार नियोजन केले आहे. पायघड्या,पुष्पवृष्टी करून आगळेवेगळे स्वागत करण्यात येणार आहे. त्याकरिता समितीचे सदस्य पुरूषोत्तम वंजारी ,श्रीकांत पाटील, उमेश राणे, सदाशिव पाटील, विशाल सापधरे,निवृत्ती पाटील, पुंजाजी झोपे, उध्दव जुनारे परिश्रम घेत आहे