मुक्ताईनगरात निकालाआधीच एकनाथ खडसेंच्या विजयाच्या अभिनंदनाचे बॅनर
मुक्ताईनगर, अक्षय काठोके : विधान परिषद निवडणुकीच्या निकाला आधीच म्हणजेच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या विजयाच्या घोषणे आधीच मुक्ताईनगर शहरात त्यांच्या अभिनंदनाचे फलक लावण्यात आले आहे.
- यावल तालुक्यात ६३ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, नव्या नेतृत्वाला मिळणार संधी !
- मुक्ताईनगर तालुक्यातील सरपंच पदासाठी ६१ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर
- रावेर तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींचे सरपंच पदा साठी आरक्षण जाहीर
काही तासांमध्ये याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली असून यासाठी मतदान झाले आहे. याआधीच मुक्ताईनगरात शहरात समर्थकांमध्ये विजयाचा आत्मविश्वास दिसत असून शहरात निकाल लागण्याआधीच नाथाभाऊंच्या अभिनंदनाचे फलक ठिकठिकाणी लागले आहेत.