मुक्ताईनगर व अंतूर्ली भागात लाखो रुपयांची वीज चोरी
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि : मुक्ताईनगर (muktainagar) व अंतूर्ली भागात लाखो रुपयांची वीज चोरी उघडकीस आली असून महावितरणच्या मुक्ताईनगर विभागांतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली गाव व परिसरामध्ये धुळे, नंदुरबार, मालेगाव व जलगाव फिरते पथक द्वारे मागील आठवड्यात कारवाई करण्यात आली.
सदरील कारवाईमध्ये मीटरमध्ये फेरफार करून कंपनीत लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या वीज ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. एकूण ३३ ग्राहकांची वीज चोरी उघडकीस आली त्यात वीजचोरी रक्कम ३११६००० असून दंडाची रक्कम ३१४००० आहे. त्यामुळे परिसरात वीज चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणलेले आहेत. महावितरण तर्फे पुढेही अशीच कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत दिले गेले आहे.