मुक्ताईनगरात गुटख्याची चोरटी वाहतूक काही थांबेना, ८.२९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि | तालुक्यातून पुन्हा एकदा अवैध गुटखा तस्करी समोर आली असून अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारे वाहन सह सुमारे ८ लाख २९ हजार २२० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून यामुळे मध्यप्रदेशातून मुक्ताईनगरकडे होणाऱ्या गुटख्याची वाहतूक सुरू असल्याचे यातून उघड झाले आहे.
तालुका अवैध धंद्यांच्या बाबतीत नेहमी चर्चेत असतो पण अवैध धंदे बंद होतांना काही दिसत नाही मध्यप्रदेश राज्यातून मुक्ताईनगर मार्गे महाराष्ट्रात विमल गुटखा तस्करी मोठ्यप्रमाणावर केली जात असल्याचे अनेकदा सामोरं आले आहे पुन्हा एकदा बर्हाणपूर मुक्ताईनगर रस्त्यांवर प्रतिबंधीत गुटखा, तंबाखू आणि तत्सम सामग्री वाहन क्रं. एमपी ६८ झेडए ९८६२ या क्रमांकांच्या वाहनांमधून वाहतूक करत असताना ८ लाख २९ हजार रूपये मूल्याचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
विशेष म्हणजे रहदारी असलेल्या मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात सायकाळी साडे चार वाजेच्या सुमारास गुटख्याची अवैध वाहतूक पकडून मुक्ताईनगर पोलीसांनी विनोद सोनवणे यांच्या फिर्यादवरून शेख अबिद शेख जहीर (वय ३०, रा. राजघाट, काली मशिदजवळ, बऱ्हाणपूर) याला अटक केली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अन्नसुरक्षा व अन्न व औषध प्रशासन व अन्नपदार्थ बंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अवैध गुटखा तस्करी रोखण्यासाठी मुक्ताईनगर पोलिस कारवाईत सातत्य राखतात का ? याकडे आता तालुका वासियांचे लक्ष लागून असून मुक्ताईनगर पोलीसांपुढें विमल गुटखा तस्करीची चोरटी वाहतूक रोखण्याचे मोठे आव्हान आहे.